
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून पहिलाच सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात कराचीला होणार आहे. पण या सामन्याला एक दिवस राहिलेला असताना न्यूझीलंडला मोठा धक्का बसला असून त्यांना संघात बदल करावा लागला आहे.
सध्या या स्पर्धेच्या आधी अनेक संघांना खेळाडूंच्या दुखापतीचा फटका बसला आहे. अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकणार आहेत. त्याच न्यूझीलंडचाही समावेश असून त्यांनाही खेळाडूंच्या दुखापतीची चिंता सतावत आहे.