Suryakumar Yadav fined by ICC after India vs Pakistan clash; BCCI appeals ahead of Asia Cup 2025 final
esakal
BCCI reaction to ICC action against India captain Suryakumar Yadav : भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला आयसीसीने शुक्रवारी दंड ठोठावला. भारत-पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबरला झालेल्या लढतीत सूर्यकुमारने विजय भारतीय सैन्याला समर्पित केला होता आणि तेव्हा त्याने पहलगाम हल्ल्याबाबत विधान केलं होतं. त्याविरोधात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) ने आयसीसीकडे तक्रार दाखल केली. आयसीसीने या तक्रारीची दखल घेताना सूर्याला मॅच फीमधील ३० टक्के रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितले आहेत.