
ICC ODI Rankings: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात असून भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला उपांत्य सामन्यात पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. आता दुसरा उपांत्य सामना बुधवारी खेळला जाईल. याचदरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे.
या क्रमवारीत भारतीय संघातील खेळाडूंना त्यांच्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. याशिवाय अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू अझमतुल्ला ओमरझाई याने मोठा पराक्रम केला आहे. ओमरझाई आता आयसीसी वनडे क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. त्याने आपलाच संघसहकारी मोहम्मद नबीला मागे टाकले आहे.