
भारत आणि इंग्लंड संघात सध्या वनडे मालिका सुरू आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (१२ फेब्रुवारी) ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली असून यात शुभमन गिलला फायदा झाला आहे. गिलने इंग्लंडविरुद्ध दोन्ही सामन्यात अर्धशतके केली होती. त्यामुळे आता तो अव्वल क्रमांकाच्याही खूप जवळ पोहचला आहे.