
ICC Latest Test Rankings: भारताचा कसोटीतील उपकर्णधार जसप्री बुमराहसाठी गेले काही महिने शानदार राहिले आहेत. त्याला काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये केलेल्या शानदार कामगिरीमुळे डिसेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आयसीसीचा पुरस्कार मिळाला होता.
आता त्याला आणखी एक चांगली बातमी मिळाली आहे. बुमराहचे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील वर्चस्व कायम राहिले आहे.