Rohit Sharma Becomes World No.1 ODI Batter! ICC Rankings Update After Stunning Australia Tour
esakal
Rohit Sharma becomes world No.1 ODI batsman in ICC rankings : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी किती जबरदस्त केली आहे, हे नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतून दिसली. सात महिन्यानंतर टीम इंडियाच्या जर्सीत परतलेल्या रोहितने त्या मालिकेत सर्वाधिक २०२ धावा करून मालिकावीर पुरस्कार जिंकला. तिसऱ्या वन डे सामन्यात त्याच्या नाबाद १२१ धावांनी भारताने मालिकेचा शेवट गोड केला. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) रोहितच्या चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी दिली आहे.