
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (२८ जानेवारी) पार पडला, ज्यात इंग्लंडने २६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे मालिकेतील आव्हानही इंग्लंडने राखले आहे.
दरम्यान, या सामन्यानंतर बुधवारी (२९ जानेवारी) आयसीसीने ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताच्या वरूण चक्रवर्ती आणि हार्दिक पांड्यासाठी आनंदाची बातमी मिळाली आहे.