
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तब्बल ८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धे खेळवली जाणार आहे. नियमानुसार २०२३ वनडे वर्ल्ड कपमधील अव्वल ८ संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळताना दिसणार आहे.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आहे. मात्र, भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलने खेळली जाणार आहे. म्हणजेच भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळेल, तर इतर संघ पाकिस्तानमध्ये त्यांचे सामने खेळणार आहेत.
या स्पर्धेसाठी भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे आठ संघ पात्र ठरले आहेत.