ICC ODI Rankings
esakal
ICC latest ODI batting ranking update: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वन डे तूनही निवृत्तीच्या चर्चा सुरू असताना, ही दोघं धडाकेबाज कामगिरी करत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डेस सामन्यात विराटने खणखणीत शतक झळकावले, तर रोहितनेही अर्धशतकी खेळी केली. विराटला या शतकाचा खूप मोठा फायदा झाला आहे आणि त्याने आयसीसीच्या ताज्या वन डे क्रमवारीत एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे रोहितची चिंता मात्र वाढली आहे.