

ICC ODI Rankings | Shubman Gill, Virat Kohli, Rohit Sharma
Sakal
India Dominates ICC ODI Batting Rankings: भारतीय क्रिकेट संघाने काही दिवसांपूर्वीच इंग्लंड दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. पण या सामन्यात भारतीय संघाला २-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
या मालिकेतील लॉर्ड्सवर निर्णयाक तिसरा सामना झाला होता, ज्यात इंग्लंडने दिलेल्या ३८८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ३६० धावा करता आल्याने २७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
मात्र असे असले तरी लॉर्ड्सवर रोहित शर्मा (Rohit Sharma), शुभमन गिल (Shubman Gill) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी चांगली कामगिरी केली होती, त्याचा फायदा आता त्यांना वनडे क्रमवारीत झाला आहे.