
भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडूंची कामगिरी चांगली राहिली. आता भारतीय खेळाडूंना आणखी आनंदाची बातमी मिळाली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत भारतीय फलंदाजांचं वर्चस्व दिसून येत आहे.
भारताचा सलामीवीर शुभमन गिल वनडे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर कायम आहे. त्याने गेल्या काही महिन्यांपासून वनडेत सातत्य राखले आहे.