ICC U19 Men’s Cricket World Cup 2026: Players to watch vaibhav suryavanshi
esakal
ICC U19 Men’s Cricket World Cup 2026 – Players to Watch : वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Suryavanshi) ने २०२५ वर्ष हे त्याच्या नावाने व कामगिरीने चर्चेत ठेवले. इंडियन प्रीमिअर लीग आणि भारताच्या १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या या १४ वर्षीय खेळाडूची आयसीसीनेही दखल घेतली आहे. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला १५ जानेवारीपासून सुरूवात होतेय आणि आतापासूनच वैभवच्या नावाची हवा सुरू झाली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत आपला दम दाखवू शकणाऱ्या संभाव्य १२ खेळाडूंची नावे आयसीसीने आज जाहीर केली आणि त्यात वैभवनेही स्थान पटकावले.