Suryakumar Yadav has entered the ICC Top 10 T20I batter rankings
esakal
ICC T20I Rankings India three batters in Top 10 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय फलंदाजांनी ट्वेंटी-२० फलंदाजांमध्ये वर्चस्व सिद्ध केले आहे. भारताचा कर्णधार पाच स्थानांची झेप घेताना ७व्या क्रमांकावर पोहोचला आहे आणि आता टॉप १० मध्ये भारताचे तीन फलंदाज दिसत आहेत. सलामीवीर अभिषेक शर्माने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे आणि त्याने अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. त्याने त्याच्या खात्यात ८० रेटींग गुणांची भर टाकली आहे.