

ICC Rejects BCB’s Request of T20 World Cup Venue Changes
Sakal
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव कायम आहे. काही दिवसांपूर्वीच बांगलादेशमधील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला आयपीएल २०२६ मधून बाहेर केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्याला काढून टाकण्याची निर्देश देण्यात आले होते. पण त्यानंतर दोन देशातील क्रिकेट संबंध आणखी बिघडल्याचे दिसत आहे.
या घटनेनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षेचं कारण देत संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतात पाठवणार नसल्याचे जय शाह यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) कळवले. मात्र आयसीसीने त्यांची ही विनंती आता मंगळवारी (१३ जानेवारी) पुन्हा फेटाळली आहे.