

Rovman Powell and Sherfane Rutherford Penalized by ICC
Sakal
India vs West Indies, 2nd T20I : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सध्या रोमांचक टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेत पहिल्या तीन सामन्यानंतर भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. मात्र ही मालिका सुरू असतानाच आयसीसीने वेस्ट इंडिजच्या रोवमन पॉवेल आणि शेरफेन रुदरफोर्ड (Rovman Powell and Sherfane Rutherford) यांच्यावर कारवाई केली आहे.
भारताविरुद्ध रांचीमध्ये झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यावेळी या दोघांकडून झालेल्या चूकीबद्दल त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या दोघांनीही रांचीच्या टी२० सामन्यात आयसीसी आचारसंहितेतील लेव्हल १ चे उल्लंघन केल्याची माहिती आयसीसीने दिली आहे.