Shubman Gill: शुभमन गिलच्या मागणीला ICC कडून प्रतिसाद नाही! चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी कायम राहणार, कारणही आलं समोर

ICC Refuses to Lift Saliva Ban Despite Shubman Gill's Demand: भारताचा कर्णधार शुभमन गिलने चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी उठवण्याची मागणी केली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हा नियम कायम ठेवणार आहे.
Shubman Gill

Shubman Gill

esakal

Updated on: 

ICC Refuses to Lift Saliva Ban Despite Shubman Gill's Demand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असल्यामुळे भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे.

मात्र, पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही. या सामन्यानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलने चेंडूला चमक आणण्यासाठी लाळ वापरण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती.

मात्र, गिलच्या या मागणीनंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आपल्या निर्णयावर ठाम आहे. चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी उठवण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचं समोर आलं आहे.

Loading content, please wait...