.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ICC T20I Ranking Update : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या ट्वेंटी-२० सामन्यात अभिषेक शर्माने वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. १३ षटकार व ७ चौकारांचा पाऊस पाडताना अभिषेकने १३५ धावांची वादळी खेळी केली. ट्वेंटी-२०च्या एका डावात सर्वाधिक षटकारांचा विक्रम अभिषेकने नावावर केला, शिवाय भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रमही त्याने नोंदवला. यासह त्याने अनके विक्रमांना गवसणी घातली आणि आयसीसीने त्याची दखल घेतली.