All You Need to Know About ICC Under-19 World Cup 2026
esakal
India Under-19 World Cup 2026 squad and fixtures live streaming India : १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या १६ व्या आवृत्तीला उद्यापासून ( १५ जानेवारी) सुरूवात होत आहे. ही स्पर्धा झिम्बाब्वे आणि नामिबिया या दोन आफ्रिकन देशांमध्ये होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने २०२४ मध्ये भारताला पराभूत करून मागील वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. पण, यावेळी भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार दिसतोय.. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Suryavanshi ) मागील वर्षभर १९ वर्षांखालील क्रिकेट गाजवले आहे आणि सर्वांचे लक्ष त्याच्याच कामगिरीवर असणार आहे.