
अनेक चर्चांनंतर आता अखेर तब्बल ८ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यास आयसीसी सज्ज झाली आहे. येत्या दोन आठवड्यात म्हणजेच १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या ठिकाणावरून आधी बराच वाद झाला होता.
या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहे. मात्र, भारताने पाकिस्तान दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत, तर इतर संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत.