Sophie Devine | India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024
Sophie Devine | India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024Sakal

Women's T20 World Cup: न्यूझीलंडची कर्णधार लढली; भारताविरुद्ध अर्धशतक ठोकत संघाला नेलं दीडशे पार

India Women Vs New Zealand Women: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारताविरुद्ध खेळताना न्यूझीलंडची कर्णधार डिवाईनने आक्रमक अर्धशतकी खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
Published on

ICC Women's T20 World Cup 2024 IND vs NZ: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. दुबईत होत असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी उतरला.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १६० धावा केल्या. त्यामुळे आता भारतासमोर विजयासाठी १६१ धावांचे लक्ष्य आहे. न्यूझीलंडकडून कर्णधार सोफी डिवाईनने अर्धशतकी खेळी केली.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडकडून सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली.

Sophie Devine | India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024
Women's T20 World Cup स्पर्धेचा सुरू होतोय रोमांच; कधी, कुठे अन् कसे पाहाणार सामने, जाणून घ्या एका क्लिकवर

त्यांची भागीदारी होत असताना ६ व्या षटकात बेट्सला बाद करण्याची संधीही भारताकडे होती. मात्र यष्टीरक्षक ऋचा घोष हिच्याकडून सोपा झेल सुटला. त्यामुळे बेट्सला १८ धावांवर जीवदान मिळाले.

पण सुदैवाने बेट्स त्याचा फायदा घेऊ शकली नाही. तिला आठव्या षटकात अरुंधती रेड्डीने श्रेयंका पाटीलच्या हातून २७ धावांवर झेलबाद केले. त्याच्या पुढच्याच षटकात आशा शोभनाने प्लिमरला ३४ धावांवर माधारी धाडले.

यानंतर एमेलिया केर आणि कर्णधार सोफी डिवाईन यांनी डाव सावरला होता. १४ व्या षटकात केरला धावबाद करण्याची संधीही भारताकडे होती. तिला धावबादही करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी आधीच डेड बॉल झाल्याने (चेंडू पूर्ण झाल्याने) भारताचे अपील नाकारण्यात आले आणि केरला जीवदान मिळाले.

Sophie Devine | India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024
Women's T20 World Cup: भारतीय खेळाडूंना पहिल्या सामन्यापूर्वी कुटुंबियांकडून खास भेट, BCCI ने शेअर केला Video

पण केरही तिला मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेऊ शकली नाही आणि १३ धावांवर रेणुका सिंगविरुद्ध खेळताना पुजा वस्त्राकरकडे झेल देत बाद झाली. मात्र डिवाईनने पुढे आक्रमक खेळ केला.

तिला ब्रुक हालीडेनेही चांगली साथ दिली होती. पण त्यांची ४६ धावांची भागीदारीही रेणूकाने तोडली. तिने ब्रुकला १६ धावांवर बाद केले. पण तरी डिवाईनने तिची लय कायम ठेवत अर्धशतक पूर्ण करण्याबरोबर संघाला १५० धावांचा टप्पाही पार करून दिला. डिवाईन ३६ चेंडूत ७ चौकारांसह ५७ धावांवर नाबाद राहिली. तसेच मॅडी ग्रीन ५ धावांवर नाबाद राहिली.

भारताकडून रेणुका सिंग ठाकूरने २ विकेट्स घेतल्या, तर अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com