ICC Women's U19 T20 World Cup 2027 Schedule : भारत-पाकिस्तान वेगळ्या गटात... वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर; गतविजेत्यांसमोर तगडे स्पर्धक

ICC Women's U19 T20 World Cup 2027 full schedule and groups: आयसीसी महिला १९ वर्षांखालील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, पुढील वर्षी २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान बांगलादेश आणि नेपाळमध्ये या स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
ICC Women's U19 T20 World Cup 2027 full schedule

ICC Women's U19 T20 World Cup 2027 full schedule

Updated on: 

ICC Women's U19 T20 World Cup 2027 venues in Bangladesh and Nepal: बांगलादेश आणि नेपाळ यांच्या संयुक्त विद्यमनाखाली होणाऱ्या १९ वर्षांखालील मुलींच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने बुधवारी जाहीर केले. २०२३ पासून या वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली आणि पुढच्या वर्षीचे तिसरे वर्ष आहे. भारतीय संघ गतविजेता म्हणून या स्पर्धेत दाखल होईल आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दुसऱ्या गटात स्थान दिले गेले आहे. १६ संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा २१ जानेवारीपासून सुरू होत आहे आणि दोन देशांतील चार वेगवेगळ्या स्टेडियमवर एकूण ४१ सामने खेळवण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com