Harmanpreet Kaur reacts after a Pakistan spinner gives her a death stare during the IND vs PAK Women’s World Cup match.
esakal
Harmanpreet Kaur reacts after a Pakistan spinner gives her a death stare : भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना अन् त्यात काही नाट्यमय घडामोडी, भांडणं झाली नाहीत, तर आश्चर्य वाटले. महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील कालच्या लढतीत पाकिस्तानी खेळाडूंची फजिती सर्वांनी पाहिली. रन आऊटवरून रडारड, कर्णधारकडून स्प्रे मारण्याचं काम, सोडलेला सोपा झेल... असे बरेच किस्से घडले. पण, एक प्रसंग असा घडला ज्यात हरमनप्रीत कौरचा 'पंजाबी' रोखठोख पणा दिसला. पाकिस्तानची फिरकीपटू नशरा संधूने फलंदाजी करणाऱ्या हरमनप्रीतकडे पाहून डोळे वटारले. त्यानंतर भारतीय कर्णधाराची रिअॅक्शन खूपच बोलकी होती आणि तो व्हिडीओ सध्या सोशल मीडिया गाजवतोय.