ICC WOMEN’S WORLD CUP POINTS TABLE
esakal
India's Standing in ICC Women’s World Cup 2025 points table : भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या रविवारी महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना होणार आहे. यजमान भारताने त्यांच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून दणक्यात सुरुवात केली. पण, पाकिस्तानला गुरुवारी बांगलादेशकडून हार पत्करावी लागली आहे. पाकिस्तानच्या या पराभवामुळे मात्र टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे आणि हरमनप्रीत कौरच्या या संघाला सावध वाटचाल करावी लागणार आहे.