India Semi Final Scenario : श्रीलंकेच्या विजयाने भारताचा मार्ग सुकर झाला; उपांत्य फेरीत पोहोचण्याचं गणित आणखी सोपं झालं

ICC Women’s World Cup 2025 semi final scenario for India : आयसीसी महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत भारताच्या उपांत्य फेरीतील संधींना आता नवी आशा मिळाली आहे. श्रीलंकेने बांगलादेशवर मिळवलेल्या रोमांचक विजयामुळे भारताचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
Sri Lanka’s win over Bangladesh helps India move closer to the ICC Women’s World Cup 2025 semi-finals.

Sri Lanka’s win over Bangladesh helps India move closer to the ICC Women’s World Cup 2025 semi-finals.

ESAKAL

Updated on

India vs New Zealand Women match qualification equation : बांगलादेश हा आयसीसी महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद होणारा पहिला संघ ठरला. श्रीलंकेने सोमवारी झालेल्या लढतीत बांगलादेशवर रोमहर्षक विजय मिळवला आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीतून एक स्पर्धक बाहेर फेकला. श्रीलंकेच्या या विजयामुळे टीम इंडियाचा उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मागील तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीत जाण्याच्या मार्गात आव्हानं उभी राहिली. पण, श्रीलंकेने भारताला आशेचा किरण दाखवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com