आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ साठी सुधारित वेळापत्रक जाहीर झाले.
बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या अनुपलब्धतेमुळे नवी मुंबईची निवड झाली.
नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर ५ सामने खेळले जातील.
ICC Women’s World Cup 2025 Navi Mumbai venue update: आयसीसीने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या अनुपलब्धतेमुळे ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आठ संघांच्या स्पर्धेसाठी बंगळुरूऐवजी नवी मुंबईची निवड करण्यात आली आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये पाच सामने होतील, ज्यामध्ये तीन लीग सामने, एक उपांत्य फेरी आणि २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामना याचाही समावेश आहे.