

India Women vs Australia Women Semi Final Marathi Cricket News : भारतीय महिला संघाची खरी कसोटी आज लागणार आहे. महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे आणि त्यात फॉर्मात आलेली सलामीवीर प्रतिका रावल ( Pratika Rawal) हिला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या संघावर ( Harmanpreet Kaur) किंचित दडपण नक्की असेल. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत भारतावर ३ विकेट्स राखून विजय मिळवला आहे आणि आयसीसी स्पर्धेसाठीच हा संघ बनला आहे, हे त्यांनी वारंवार सिद्ध केलं आहे. भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलिया हे एकमेव आव्हान नाही, तर पाऊसही त्यांच्या मार्गात खोडा घालण्याचा अंदाज होताच. पावसामुळे सामना थांबला आहे.