Jemimah Rodrigues and Harmanpreet Kaur Power India to Final
esakal
India Women vs Australia Women Semi Final Marathi Cricket News : भारतीय संघाने २०१७ नंतर पुन्हा एकदा बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला. जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद १२७ धावांच्या जोरावर भारताने महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. २ नोव्हेंबरला जेतेपदाच्या लढतीत त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. या फायनलच्या निमित्ताने महिला वर्ल्ड कप स्पर्धेला नवा विश्वविजेता संघ मिळणार आहे. भारताने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर दक्षिण आफ्रिका प्रथमच जेतेपदासाठी खेळणार आहे. या विजयानंतर जेमिमा रॉड्रीग्ज रडू लागली आणि तिने हात जोडून सर्वांचे आभार मानले. हरमनप्रीत कौरलाही अश्रू अनावर झाले.