Jemimah Rodrigues smashed a classy century while Harmanpreet Kaur scored 89
esakal
India Women vs Australia Women Semi Final Marathi Cricket News : ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी धावांचा पाठलाग करताना भारताने ५९ धावांत २ विकेट्स गमावल्या, परंतु जेमिमा रॉड्रिग्ज ( Jemimah Rodrigues ) व कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur ) ही जोडी मैदानावर उतरली. या दोघींनी ऑस्ट्रेलियाच्या जबड्यातून सामना अक्षरशः खेचून आणला आहे. महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हरमनप्रीतचे शतक थोडक्यात हुकले असले तरी जेमिमासह तिने विक्रमी भागीदारी केली.