Australia posted over 300 runs against India in the ICC Women’s World Cup semi final
ESAKAL
India Women vs Australia Women Semi Final Marathi Cricket News : फोएबे लिचफिल्ड ( Phoebe Litchfield Century)आणि एलिसे पेरी ( Ellyse Perry) यांच्या १५५ धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियन संघाचा पाया मजबूत केला. ही जोडी मैदानावर असेपर्यंत भारतीय संघाची गोलंदाजी प्रभावहिन दिसत होती. लिचफिल्ड व पेरी आपली जबाबदारी पूर्ण करून माघारी परतल्या आणि टीम इंडियाने काही काळासाठी सामन्यात पुनरागमन केले. पण, अॅश्लेघ गार्डनरने ( Ashleigh Gardner ) अनुभवाच्या जोरावर शेवटच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली आणि संघाला तीनशेपार पोहोचवले. भारताकडून श्री चरणी व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.