
ICC Clothing Rule: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला आता महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेचे आयोजक पाकिस्तान आहे. मात्र भारताने पाकिस्तान दौरा करण्यासाठी नकार दिलेला असल्याने भारताचे सर्व सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
परंतु, अन्य सर्व सहभागी संघ पाकिस्तानला जाणार आहेत. खरंतर यापूर्वीच या स्पर्धेसाठी भारत-पाकिस्तान यांच्यात बरेच वाद झाले आहेत. या वादांनंतर अखेर ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. अशातच आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.