
इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेला बुधवारपासून सुरूवात होत आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करताना दिसणार आहेत. या मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड संघात ६ फेब्रुवारीपासून वनडे मालिका होणार आहे.
ही वनडे मालिका चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेआधी होत असल्याने दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या मालिकेत खेळणारे संघच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळताना दिसणार आहे.