HARDIK PANDYA IPL 2027 FUTURE
esakal
Which IPL team can sign Hardik Pandya after Mumbai Indians? हार्दिक पांड्याचा इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास संपुष्टात आल्यात जमा झाला आहे. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनलेल्या हार्दिकला MI चाहत्यांकडून प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला, त्यात अंतर्गत गटबाजीला तो वैतागला होता. मानसिक तणावाखाली गेलेल्या हार्दिकने IPL 2026 सुरू असतानाच फ्रँचायझीला त्याला निर्णय सांगितल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार कोण असेल, यासोबतच हार्दिक IPL 2027 मध्ये कोणत्या संघाकडून दिसेल, याचीही उत्सुकता आहे.