
Sachin Tendulkar-Vinod Kambli: भारताचे आणि मुंबईचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मैत्री जगजाहीर आहे. हे दोघेही लहानपणापासूनचे मित्र असून शालेय क्रिकेटपासून एकत्र खेळले आहेत. पण मध्यंतरी त्यांच्या मैत्रीत मिठाचा खडाही पडला होता, ज्यामुळे काही वर्षे ते बोलत नव्हते.
सचिनच्या निवृत्तीच्यावेळीही कांबळीची गैरहेजेरी अनेकांना जाणवली होती. पण नंतर त्यांच्यातील दुरावा मिटला आणि त्यांनी आपापसातील गैरसमज दूर करत पुन्हा मैत्रीचं नातं जोडलं.
दरम्यान, त्यांच्या मैत्रीला त्याआधीही ९० च्या दशकातही धक्का लागला होता, यामागे कांबळीची वागणूक कारणीभूत ठरली होती. याबाबत संजय मांजरेकरांनी तीन वर्षांपूर्वी खुलासा केला होता.