

Champions Trophy 2025 Tejashwi Yadav : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भवितव्यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. पाकिस्तानकडे पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेचे यजमानपद आहे आणि भारतीय संघाने पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला आहे. BCCI चा हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) धुडकावला आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची ( ICC) गोची झाली आहे. त्यामुळेच आयसीसीने आज तातडीची बैठक बोलावली आहे आणि काय तो फैसला आज होणार आहे.