ODI मध्ये यशस्वी होण्यासाठी, ऋतुराज गायकवाडला भारत सोडण्याचा सल्ला; हा फलंदाज परदेशात असता तर...

Aakash Chopra on Ruturaj Gaikwad ODI selection: भारतीय क्रिकेटमध्ये अपार गुणवत्ता असूनही अनेक खेळाडूंना सातत्याने संधी मिळत नाही, यावर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने मोठे भाष्य केले आहे. त्याच्या मते ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल व रिंकू सिंग हे खेळाडू जर भारताऐवजी एखाद्या दुसऱ्या देशाकडून खेळत असते, तर ते आज त्यांच्या वन डे संघाचे कायमस्वरूपी सदस्य असते.
RUTURAJ GAIKWAD SELECTION UPDATE

RUTURAJ GAIKWAD SELECTION UPDATE

esakal

Updated on

Indian team selection unfair says Aakash Chopra : भारतीय संघ निवडीवरून नेहमी कोणत्या कोणत्या खेळाडूवर अन्याय झाल्याची चर्चा रंगली जाते. पण, यावेळी जे खेळाडू संघाबाहेर बसले आहेत, ते दुखापतीमुळे नव्हे किंवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आवडीच्या खेळाडूंमुळे नव्हे, तर संघात स्थान पटकावण्यासाठी वाढलेल्या चुरशीमुळे... या खेळाडूंमध्ये देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) आणि रिंकू सिंग यांचे नाव आघाडीवर आहे. या तिघांनी देशांतर्गत क्रिकेट गाजवले आहे आणि तरीही भारताच्या वन डे संघात यांना स्थान मिळत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com