
Cricketer Yuzvendra Chahal and Dhanashree Verma’s Divorce: Alimony Details : ट्वेंटी-२० क्रिकेट गाजवणारा भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या 'फिरकी'मुळे चर्चेत आला आहे. पत्नी धनश्री वर्मासोबत त्याच्या कथित घटस्फोटाच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. असं अचानक काय झालं, की दोघांना घटस्फोट घ्यावासा वाटतोय? हा प्रश्न दोघांच्याही चाहत्यांना सतावतोय. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले असून एकमेकांचे फोटोही डिलीट केल्याने, घटस्फोटाच्या चर्चांना खतपाणी मिळाले आहे.