Mohammed Siraj celebrates after dismissing Sam Konstas for 49 in India A vs Australia A 2nd unofficial Test
esakal
भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ दुसरी चारदिवसीय लढत आजपासून सुरू झाली आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघ प्रथम फलंदाजीला उतरला, परंतु सुरुवात फार चांगली झाली नाही.
मोहम्मद सिराजने चॅलेंज देणाऱ्या १९ वर्षांच्या सॅम कॉन्स्टासला ४९ धावांवर बाद केले.
Mohammed Siraj first wicket against Australia A in 2nd unofficial Test : भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ यांच्यातली दुसरी चारदिवशीय लढत आजपासून सुरू झाली. ऑस्ट्रेलिया अ संघ प्रथम फलंदाजीला उतरला, परंतु मागील लढतीप्रमाणे त्यांना चांगली सुरुवात करता आली नाही. प्रसिद्ध कृष्णाने चौथ्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कॅम्पबेल केल्लवे ( ९) याला बाद केले. कॅम्पबेलने पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली होती. मात्र, त्यानंतर सॅम कॉन्स्टास व कर्णधार नॅथन मॅकस्वीनी यांनी ऑस्ट्रेलिया अ संघाचा डाव सारवला. ही जोडी मोहम्मद सिराजने तोडली.. भारताला चॅलेंज देणाऱ्या १९ वर्षांच्या सॅमन कॉन्स्टासला त्याने बाद केले.