
भारतीय अ संघाचा इंग्लंड अ संघाविरुद्ध नॉर्थम्पटनला झालेला दुसरा चारदिवसीय सामना चौथ्या दिवशी अनिर्णित राहिला आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना मोठी आघाडी घेण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
तसेच गोलंदाजीत खलील अहमद, अंशुल कंबोज हे चमकले आहेत. या सामन्यात फलंदाजीत केएल राहुलने दाखवलेल्या फॉर्ममुळे भारतीय संघालाही आगामी कसोटी मालिकेपूर्वी दिलासा मिळाला असेल.
चौथ्या दिवशी भारतीय संघाने दुसऱ्या डावाती ३४ षटकापासून आणि ४ बाद १६३ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. यावेळी ध्रुव जुरेल ६ धावांवर आणि नितीश कुमार रेड्डी १ धावेवर नाबाद होते.