
भारतीय अ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून दुसरा चार दिवसीय सामना नॉर्थम्पटनमध्ये सुरू आहे. इंग्लंड अ संघाविरुद्ध (England Lions) सुरू असलेल्या या सामन्यात केएल राहुलने कमालीचा खेळ केला आहे. त्याने दोन्ही डावात शानदार फलंदाजी केली आहे.
या सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व दिसून येत आहे. तिसऱ्या दिवस अखेर भारताने १८४ धावांनी आघाडी घेतली आहे. कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने शानदार खेळी केली.
या सामन्यात तिसऱ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या दिवशी ४७ व्या षटकापासून आणि ३ बाद १९२ धावांपासून पुढे खेळायला सुरूवात केली. त्यावेळी जॉर्डन कॉक्स आणि कर्णधार जेम्स ऱ्ह्यु हे नाबाद होते.