IND Under-19 vs Young Lions, ENG-U19 vs IND-U19
भारताच्या सीनियर संघाला पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने चौथ्या डावात ३७१ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शुभमन गिल आणि टीमवर चौफेर टीका होत असताना दुसरीकडे भारताच्या १९ वर्षांखालील संघाने दमदार कामगिरी केली आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील या संघाने वन डे सामन्यात ४४२ धावांचा डोंगर उभा केला आणि यंग लायन्स निमंत्रित एकादश संघाविरुद्ध २३१ धावांनी विजय मिळवला.