Predicted India playing XI for IND vs AFG 1st ODI
esakal
India vs Afghanistan first ODI team prediction: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला शनिवारपासून ( १३ जून) सुरुवात होत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीचा शुभारंभ, या मालिकेतून करणार आहे. भारतीय संघाला मागील वन डे मालिकेत न्यूझीलंडकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर टीम इंडियाने ट्वेंटी-२० व कसोटी मालिका खेळल्या आहेत. पण, आता वर्ल्ड कपच्या तयारीला संघ लागला आहे. विराट कोहली व हार्दिक पांड्या यांनी मालिका सुरू होण्यापूर्वीच माघार घेतली आहे आणि त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध राखीव फळीतील खेळाडूंना आजमावून पाहण्याची हीच योग्य संधी आहे.