Vaibhav Sooryavanshi
esakal
Will Vaibhav Sooryavanshi make his home debut in 3rd T20I? भारतीय संघाने दुसरी ट्वेंटी-२० जिंकून अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या या मालिकेत भारताने दुसरी लढत ७ विकेट्स राखून सहज जिंकली. या सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) चमकला. त्याच्या ५७ धावांच्या वादळी खेळीला अभिषेक शर्माची दमदार साथ मिळाली. आता संजूचा फॉर्म परतल्याने त्याला तिसऱ्या सामन्यासाठी बाकावर बसवणे अशक्यच वाटतेय, अशात वैभव सूर्यवंशीला संधी मिळेल का? हा प्रश्न उपस्थित राहत आहेच. कर्णधार श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) याबाबत महत्त्वाचे विधान केले.