Jasprit Bumrah
Jasprit Bumrah replacement for Afghanistan T20I series 2026: भारत-अफगाणिस्तान यांच्यातली ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका १३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी BCCI ने १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे, परंतु त्यात चार खेळाडूंचा समावेश हा तंदुरुस्ती अहवालावर अवलंबून आहे. यामध्ये स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, याच्या नावाचा समावेश आहे. बुमराहचा सहभाग पूर्णपणे ९ सप्टेंबर रोजी सेंटर ऑफ एक्सलन्स ( CoE) येथे होणाऱ्या फिटनेस चाचणी सामन्यावर अवलंबून आहे. बुमराह चाचणीत अपयशी ठरला, तर निवड समितीला एका मजबूत पर्यायी खेळाडूची निवड करावी लागेल.