India vs Afghanistan
esakal
India vs Afghanistan 1st T20I September 13 latest update: भारत-अफगाणिस्तान यांच्यातला पहिला ट्वेंटी-२० सामना ठरलेल्या १३ तारखेला होणार आहे का? हा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघटनेच्या यजमानपदाखाली नवी दिल्लीत ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ अरुण जेटली स्टेडियमवर पोहोचले आहेत आणि सरावालाही लागले आहेत. पण, पहिल्या सामन्याची तारीख बदलण्यात यावी, असे पत्र दिल्ली पोलिसांच्या वाहतुक विभागाकडून दिल्ली क्रिकेट संघटनेला पाठवण्यात आले आणि गोंधळ सुरू झाला.