Virat Kohli interview with Ravi Shastri and Adam Gilchrist video
esakal
Virat Kohli’s Subtle Response to Future Speculation : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ७ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरला. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या वन डे सामन्यात विराटला ८ चेंडूंत शून्य धावांवर माघारी परतावे लागले, परंतु भारतासाठी खेळण्याची त्याची भूक अजून संपलेली नाही. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट ५-६ महिने कुटुंबियांसोबत लंडनमध्ये होता आणि तो टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाला. विराट २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप खेळणार की नाही? हा प्रश्न सध्या सर्वांना सतावतोय.