Rain halts IND vs AUS 1st ODI for over an hour
esakal
India vs Australia 1st ODI Marathi Cricket News : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला वन डे सामना पावसामुळे थांबला आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या पुनरागमनाची उत्सुकता क्षणिक ठरली. रोहित ८ धावांवर, तर विराट ८ चेंडूंत शून्य धावांवर बाद होऊन माघारी परतला. वन डे संघाचा नवा कर्णधार शुभमन गिलही १० धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद २५ अशी दयनीय झाली. त्यात पावसाच्या व्यत्ययाने भारतीय चाहत्यांची चिडचिड होताना दिसतेय. गिलच्या विकेटनंतर १० मिनिटांच्या पावसामुळे १ षटक कमी करण्यात आले होते, आता तर १ तास झाला पाऊस सुरू आहे.