Australia Beat India in Rain-Hit ODI, Lead 3-Match Series 1-0
esakal
Cricket
IND vs AUS 1st ODI Live: रोहित, विराटच्या पुनरागमनाचा फुसका बार... ऑस्ट्रेलियाच्या डावपेचांसमोर भारताची हार! मालिकेत आघाडी
India vs Australia 1st ODI Marathi Cricket News : ऑस्ट्रेलियाने अखेर पर्थवर वन डे मॅच जिंकली. भारताला पराभूत करण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला येथे तिन्ही सामन्यांत हार पत्करावी लागली होती.
India vs Australia 1st ODI Marathi Cricket News : भारतीय चाहते आज निराश होऊन परतले.. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या २२४ दिवसांनी पुनरागमनाच्या उत्सुकतेपोटी चाहते स्टेडियमवर आले होते. पण, हे दोन्ही दिग्गज अपयशी ठरले. त्यात इतरांनीही निराश केले. अक्षर पटेल व लोकेश राहुल यांनी संघाला ठिकठाक धावा उभारून दिल्या. पण, त्या पार करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला फार कष्ट घ्यावे लागले नाही. पर्थवर आतापर्यंत एकही वन डे सामना न जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने ही मालिका खंडित केली. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.