
India vs Australia 1st ODI Marathi Cricket News
esakal
India vs Australia 1st ODI Marathi Cricket News : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात सर्वांचे लक्ष लागले आहे ते, विराट कोहली व रोहित शर्मा यांच्याकडे... जवळपास ७ महिन्यानंतर हे दोन दिग्गज ब्लू जर्सीत दिसणार आहेत आणि ही मालिका त्यांचे २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे भविष्य ठरवणारी असू शकते. त्यामुळे या मालिकेला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यात शुभमन गिल हा भारताच्या वन डे संघाचा नवीन कर्णधार म्हणून सुरूवात करणार आहे.