Virat Kohli dismissed for duck by Mitchell Starc as India collapse to 25/3
esakal
India vs Australia 1st ODI Marathi Cricket News : भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात अपेक्षित सुरुवात मिळाली नाही.. रोहित शर्मा व विराट कोहली हे सात महिन्यांनी मैदानावर उतरले होते आणि त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वन डे संघात त्यांच्या समावेशामुळे प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती, परंतु त्यांच्या वाट्याला निराशा आली. चौथ्या षटकात रोहित बाद झाला आणि पाठोपाठ विराट व शुभमन यांनीही तंबूचा रस्ता धरला.