Virat Kohli surpasses Rohit Sharma and Sourav Ganguly in ducks in ODIs
esakal
Virat Kohli batting failure against Australia in Perth ODI : विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन काही खास राहिले नाही. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट टीम इंडियाच्या जर्सीत दिसला नव्हता आणि तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यातून निळ्या जर्सीत दिसला. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, परंतु ती उत्सुकता ८ चेंडूंपुरतीच मर्यादित राहिली. मिचेल स्टार्कने त्याला भोपळ्यावर बाद केले आणि १३ वर्षांत प्रथमच तो ऑस्ट्रेलियात वन डे सामन्यात शून्यावर बाद झाला. याशिवाय त्याने स्वतःच्या नावावर आणखी एक नकोसा विक्रम नावावर केला.